धक्कादायक! पुण्यातील सिंहगड रोडवर गॅसची पाईपलाईन फुटून अग्नितांडव

Shocking! A gas pipeline burst on Sinhagad Road in Pune

पुण्यात काल मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरील ( Sinhgad Road) दांडेकर पुलाजवळील गॅसची पाईपलाईन फुटली आहे. मध्यरात्री यामुळे अचानक जमिमीतून आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसत होत्या. या आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड होते. रात्री बारा वाजल्यापासून अग्निमशन दल आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पहाटे चार वाजले.

पिंपरी ग्रामपंचायतच्या वतीने मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा

सिंहगड रोडवरील MNGL गॅसची पाईपलाईन फुटल्याने ही आग लागली होती. फक्त एकाच ठिकाणी नाही तर आजूबाजूला तीन ठिकाणी ही आग पसरली होती. पाईपमधून गॅसचा प्रवाह सुरूच असल्याने ही आग आटोक्यात येत न्हवती. या पार्श्वभूमीवर सिंहगड रोडवरील एका भागातील वाहतूक काही काळासाठी थांबविण्यात आली होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.

राखी सावंत प्रेग्नेंट? मोठा खुलासा करत म्हणाली…

मात्र त्यांना देखील आग नियंत्रणात आणण्यासाठी तीन- चार तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. यासाठी अधिकचे पाण्याचे बंब बोलबावे लागले होते. याशिवाय पुण्यातील नर्हे आंबेगाव या परिसरात देखील भंगारच्या गोडाऊनला आग लागली होती. याठिकाणी सुद्धा आग नियंत्रणात आणण्यासाठी धावपळ सुरू होती.

जगातील पहिले रोबोट कॅफे! कॉफी पासून स्नॅक्स पर्यंत रोबोटच बनवून हातात देणार…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *