दौंड तालुक्यातील पाटस-कुसेगाव (Patus-Kusegaon) मार्गावर अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील पती,पत्नीसह मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
“फक्त बारामतीकरांच्या विरोधात भुंकण्यासाठीच…”, विद्या चव्हाण यांची गोपीचंद पडळकरांवर जोरदार टीका
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष सदाशिव साबळे, रोहीणी संतोष साबळे, गुरु संतोष साबळे, अशी मृत व्यक्तींची नवे आहेत. तेथील स्थानिक नागरीकांनी जखमी व मयतांना दवाखान्यात हलविले. यावेळी उपचारापुर्वीच चार वर्षाचा मुलगा मयत झाला.
ब्रेकिंग! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये सोन्याची खाण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती
दरम्यान, अपघात झाल्यांनतर ट्रक चालक पळुन गेला. वाहन चालकांच्या बेशिस्तपणामुळे अशा धक्कादायक घटना घडत आहेत. मागच्या काही दिवसापासून या मार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे.
चक्क लोकांनी उचलले घर; ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!