सध्या नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंचाळे गावाजवळ एका स्विफ्ट कारने बाळूमामाच्या मेंढरांच्या कळपाला धडक दिल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या अपघातामध्ये जवळपास १५ मेंढरांचा मृत्यू झाला आहे. तर काही मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. माहितीनुसार हा अपघात शनिवारी झाला आहे.
अजित पवार यांनी राहुल कलाटेंना दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, “माझी विनंती आहे की…”
बाळूमामाच्या मेंढ्या असलेल्या १३ नंबरच्या पालखीचा सिन्नरच्या मिरगाव या ठिकाणी मुक्काम होता. या पालखीसोबत तब्बल अडीचशे मेंढ्यांचा कळप पंचाळे शिवारातील एका शेताच्या दिशेने जात होता. त्यावेळी एक भरधाव स्विफ्ट या कळपात घुसली आणि अपघात घडला आहे.
राष्ट्रवादीला मोठा धक्का! शरद पवारांच्या सर्वात जवळच्या व्यक्तीने केला भाजपमध्ये प्रवेश
यामध्ये चेंगराचेंगरी होऊन जवळपास १५ मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे तर काही मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. आता या घटनेने तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गहू काढणीसाठी ‘हे’ कृषी यंत्र ठरतंय फायदेशीर; कमी वेळात आणि कमी पैशात होते जास्त काम