सध्या पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत त्यामुळे लोकांचे इलेक्ट्रिक कार वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेकजण इलेक्ट्रिक कार खरेदी करत आहे. यामुळे पेट्रोलची मोठ्या प्रमाणात बचत देखील होत आहे. मात्र सध्या पुण्यात भररस्त्यात चालू इलेक्ट्रिक कारने पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
‘जे भाजपामध्ये जातील तो त्यांचा वैयक्तिक निर्णय’ शरद पवार स्पष्टच बोलले
ही घटना रविवारी सांयकाळी घडली असून, पुण्यातील कात्रज मोरेबाग समोरील सातारा रस्त्यावर घडली आहे. इलेक्ट्रॉनिक कारच्या बोनेट मधून अचानक धूर येऊ लागला. यांनतर याची माहिती मिळताच लगेचच कारचे चालक कारमधून बाहेर पडले आणि करणे भररस्त्यात पेट घेतला. यामुळं तेथील नागरिकांची देखील तारांबळ उडाली.
नागपूरच्या वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरे कडाडले! विरोधकांवर निशाणा साधत म्हणाले…
या घटनेबद्दल माहिती मिळताच वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे यांनी अग्निशमन दलास याबाबत माहिती दिली. आणि ही आग विझविण्यात आली. सुदैवानी या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की…