Pune News । धक्कादायक! बंदी असताना प्रवास करणे आले अंगलट, तिघांसह कार कोसळली धरणात

Shocking! Anglat came to travel during the ban, the car with three people crashed in the dam

Pune News । पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने चांगलेच थैमान (Heavy Rain in Maharashtra) घातले आहे. नद्या- नाल्यांना पुर (Flood) आला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. पुरामुळे अनेक नागरिक स्थलांतर करत आहेत. पुणे घाटमाथ्यावरदेखील पावसाने दमदार हजेरी (Heavy Rain in Pune) लावली आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने वरंधा घाट (Varandha Ghat) रस्ता बंद केला आहे. (Latest Marathi News)

PM Kisan Yojna। 14 वा हप्ता जमा झाला नाही? काळजी करू नका, ‘या’ हेल्पलाईन नंबरवर करा फोन

अनेकजण बंदी असताना या ठिकणाहून प्रवास करत आहेत. परंतु काही प्रवाशांना हा प्रवास चांगलाच महागात पडला आहे. वरंधघाट घाट मार्गे कोकणात जात असणाऱ्या मार्गावर एक कार नीरा देवघर धरणात (Neera Deoghar Dam) पडली आहे. दरम्यान, या कारमध्ये तिघे जण प्रवास करत होते. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

T20 World Cup 2024 । क्रिकेट प्रेमींसाठी गुडन्यूज ! टी 20 वर्ल्ड कप 2024 चे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेला होणार सामने

अजूनही या कारमधील तिघांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. पुणे वरंधा घाटातील रस्ता 22 जुलै ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे. तरीही नियम धुडकावून लावून हे प्रवासी कसे गेले? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Bus Accident । भीषण अपघात! दोन खासगी बसची समोरासमोर धडक, सहा जणांचा मृत्यू तर २५ जण जखमी

हे ही पहा

Spread the love