त्रिपुरा विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान भारतीय जनता पक्षाचा (भाजप) आमदार आपल्या फोनवर पॉर्न पाहत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ ईशान्य भारतीय राज्यातील बागबासा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजप आमदार जाधव लाल नाथ (BJP MLA Jadhav Lal Nath) यांचा असल्याची माहिती समोर आली आहे.
‘मी खेळायला येत आहे’ IPL 2023 सुरू होण्यापूर्वी ऋषभ पंतचा समोर आला एक व्हिडिओ
सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभेत राज्याच्या अर्थसंकल्पाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना ही घटना घडली. हा व्हिडिओ जाधव लाल नाथ यांच्या मागे बसलेल्या कोणीतरी शूट केला आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चांगलाच चर्चेत आहे.
सर्वांत मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा केल्याप्रकरणी ४०० ते ५०० जणांवर गुन्हे दाखल
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने आमदाराकडून स्पष्टीकरण मागितले असून त्यांना समन्स बजावले आहे. जादव लाल नाथ यांनी अद्याप या आरोपांवर किंवा व्हिडिओवर प्रतिक्रिया दिलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशन संपताच ते विधानसभेच्या आवारातून बाहेर पडले आहेत.
हास्यजत्रा फेम गौरव मोरे सोबत सुजय विखे पाटील यांचा भन्नाट डान्स; पाहा Video