सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकदा प्रेमी युगुलांचे ट्रेन मध्ये, बस मध्ये किंवा रस्त्यावर किस (kiss) करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. मध्यंतरी तर चालू टेम्पोच्या छतावर एक कपल सेक्स करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान दिल्ली मेट्रो ( Delhi metro) मधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये एक मुलगा व मुलगी मेट्रोमध्ये खाली बसून लिपलॉक किस (Liplock kiss) करत आहेत.
व्हायरल झालेला व्हिडीओमध्ये एक मुलगा मेट्रोमध्ये खाली बसला आहे आणि त्याच्या मांडीवर त्याची गर्लफ्रेंड पडली आहे. याठिकाणी दोघेही एकमेकांना किस करताना पहायला मिळत आहेत. समोरील सीट वर बसलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ काढला आहे. या व्हिडीओ वरून दिल्ली मेट्रोवर लोकांनी ताशेरे ओढले आहेत. डीसीपी दिल्ली मेट्रोला टॅग करत एका यूजरने ट्विटरवर लिहिले, तुम्ही जागे आहात का? असे म्हंटले आहे.
तसेच दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दिल्ली मेट्रोमध्ये सतत अशी प्रकरणे घडत आहेत. मेट्रोमधील महिलांच्या सुरक्षिततेसाठी अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करायला हवी. असे मत दिल्ली महिला आयोगाने यावेळी मांडले आहे. दिल्ली मेट्रोने काही दिवसांपूर्वीक या पार्श्वभूमीवर प्रवाशांना आवाहन देखील करण्यात आले होते.
लघवीमध्ये ‘हा’ बिघाड म्हणजे हृदयरोगाचे लक्षण! जाणून घ्या सविस्तर…