सध्या उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूर (Kanpur) येथील दहावीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याचा क्रिकेट खेळत असताना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Nilesh Lanke: आमदार निलेश लंके यांनी घेतले उपोषण मागे
माहितीनुसार, हा विद्यार्थी (student) खेळता खेळता खाली पडला आणि बेशुद्ध झाला. नंतर त्याला ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनच्या तुफानी 150 धावा
मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव अनुज असे होते. त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, तो बुधवारी मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. पण खेळता खेळतच खेळपट्टीच्या मध्यभागी धाव घेत असताना अनुज अचानक बेशुद्ध पडला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचेडॉक्टरांचे म्हणणे आहे.
स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन; नुकसान भरपाई न देणाऱ्या विमा कंपन्यांवर करावाई करण्याची मागणी