मागील काही दिवसांपासून उत्तर भारतात (North India) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याचा फटका राजधानी दिल्लीला मोठ्या प्रमाणात बसला आहे. यमुना नदीने (Yamuna River) धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे दिल्ली येथे मागील चार दिवसांपासून पूरस्थिती (Delhi Flood) निर्माण झाली असल्याने येथील जनजीवन विस्कळीत संपूर्ण झाले आहे. दिल्लीत पावसाचा ४० वर्षांचा विक्रम मोडला आहे. (Latest Marathi News)
नागरिकांनो सावधान! राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस; हवामान विभागाची माहिती
दरम्यान, या पुराच्या पावसाने दिल्लीतील (Delhi) रस्ते जलमय झाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा सर्वात मोठा फटका सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) परिसरालाही बसला आहे. पुराचे पाणी कोर्टाच्या दारात गेले आहे. त्याशिवाय राजघाट परिसरात पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. शांती वन परिसरातही पाणी साचले आहे. यमुना बाजार परिसरात पूर आला आहे.
दूध उत्पादकांना मोठा फटका! गोकुळच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
दिल्लीत ४१ वर्षांचा विक्रम मोडला असून यापूर्वी १९८२ मध्ये सर्वात जास्त १५३ मिमी पाऊस झाला होता. दरम्यान, पावसामुळे अधिकाऱ्यांच्या सर्व सुट्या रद्द केल्या असून नुकसानग्रस्त भागांचा दौरा करण्याचे आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.