धक्कदायक! कुत्र्याने डिलिव्हरी बॉयचा घेतला जीव; “थेट तिसऱ्या मजल्यावरून…”

Shocking! Dog kills delivery boy; "Straight from the third floor..."

आजकाल अनेक लोक घरबसल्या काही ना काही ऑर्डर (Order) करत असतात. लोकांपर्यंत ही ऑर्डर पोहचवण्याचं काम डिलिव्हरी बॉय (Delivery boy) करत असतो. मात्र सध्या एका डिलिव्हरी बॉय सोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्यामध्ये डिलिव्हरी बॉयने स्वतःचा जीव गमावला आहे.

काळाने घातला घाला! दोन सख्ख्या बहिणींचा विहरीत बुडून मृत्यु

हैद्राबाद (Hyderabad) शहरामध्ये डिलिव्हरी बॉयवर कुत्र्याने इतका भयानक हल्ला केला की यामध्ये डिलिव्हरी बॉयचा मृत्यू (Delivery Boy) झाला आहे. घटना अशी घडली की, डिलिव्हरी बॉय ज्यावेळी फूड द्यायला गेला होता, त्यावेळी घरी असलेल्या कुत्र्याने त्यांच्या अंगावर हल्ला केला. यामध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात घाबरलेल्या डिलिव्हरी बॉयने तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी घेतली. त्यावेळी तो गंभीर जखमी झाला असून त्याचा मृत्यू झाला.

शिवसेना कुणाची? आज निर्णय होण्याची शक्यता; निवडणूक आयोग देणार महत्त्वाचा निर्णय

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझवान असे या डिलिव्हरी बॉयचे नाव होते. तो २३ वर्षांचा होता रिझवानने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर त्याला ताबोडतोब रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र तो गंभीर जखमी असल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

करोडपती शेतकऱ्यांच्या ‘या’ गावाबद्दल वाचून तुम्हीही व्हाल थक्क! फक्त एका पिकामुळे पालटले गावचे रूप

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *