अवकाळी पावसाने (Unseasonal rain) शेतकऱ्यांच्या (Farmer) पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेतकऱ्यांच्या पालेभाज्या, फळपिके याचे आतोनात नुकसान झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या गव्हाचे देखील या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! फक्त 1 रुपयांत मिळणार पीकविमा
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने गव्हाच्या पिकाचे झालेलं नुकसान पाहून गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंगापूर तालुक्यातील वाहेगाव या ठिकाणी ही घटना घडली आहे. त्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
रामदास कदम यांना मोठा धक्का! जवळच्या माणसावर ईडीची मोठी कारवाई
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव अशोक शिरसाट असे आहे. माहितीनुसार, मागच्या दोन दिवसापूर्वी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला यामुळे गव्हाचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. यामुळे झालेल्या नुकसानीचा धसका घेत या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.
सुषमा अंधारे यांनी उडवली फडणवीसांच्या अर्थसंकल्पाची खिल्ली; म्हणाल्या…