दौंड : अलीकडे आपल्याकडे चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता दौंड (Daund) शहरामध्ये घडली आहे. दौंड शहरामध्ये घर फोडून दहा लाख बहात्तर हजार रुपये आणि सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे.
मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या २८७ शाळा बंद होण्याच्या मार्गावर? राज्य सरकारने घेतला निर्णय
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रिया महेश रणसिंग (Priya Mahesh Ransingh) यांचे घर फोडल्याची घटना घडली आहे. १४ ऑक्टोबर रोजी प्रिया या आठ वाजण्याच्या सुमारास घर बंद करून बाहेर गेले असता. चोरटयांनी घराच्या पाठीमागे असणाऱ्या बाथरूमची जाळी काढून घरात प्रवेश केला व दहा लाख बहात्तर हजार रुपये आणि सोन्याचे दागिने लंपास केले.
दिवाळीनिमित्त भारतीयांसाठी इंस्टाग्रामची खास ऑफर, रील्स बनवा अन्…; पाहा नेमकी काय आहे ऑफर?
दरम्यान, या घटनेमुळे दौंड परिसरात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपस पोलीस (Police) यंत्रणा करत आहे. दौंडमध्ये सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे शहरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात निघाल्या आळ्या, परिसरात उडाली खळबळ