
सध्याचं युग इंटरनेट, सोशल मीडियाचे (internet, social media) आहे. सोशल मीडिया हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. अनेक जण दिवसातील कित्येक तास केवळ सोशल मीडियावर घालवतात. यादरम्यान गेल्या वर्षांपासून फेसबुकची (Facebook) लोकप्रियता कमी झाल्याचे पाहायला मिळत असून त्याची जागा इंस्टाग्रामने (Instagram) घेतली आहे.
मोठी बातमी! OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे निधन
इंस्टाग्राम हे आता केवळ फोटो किंवा व्हिडीओ शेअरिंग अॅप राहिलेले नसून पैसा कमवण्याचे माध्यम झाले आहे. मात्र, यासाठी तुमचे लाखो फाॅलोअर्स असणे गरजेचे आहे. तुमचे जेवढे जास्त फाॅलोअर्स असतील तेवढे तुम्ही लोकप्रिय आहात, असे मानले जातात. जेवढे जास्त फॉलोवर्स तेवढी जास्त कमाई. त्यामुळे लोक आपल्या इंस्टाग्रामचे फॉलोवर्स वाढविण्याचा प्रयत्न करत असतात.
सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिली धक्कदायक माहिती
दरम्यान, फॉलोवर्स वाढविण्याच्या नादात एका मुलीची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवून देतो असं म्हणत एका 16 वर्षांच्या मुलीला अज्ञाताने गंडा घातला आहे. तिची हजारो रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई लोकल ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स पाहून लोकंही हैराण, घटना कॅमेऱ्यात कैद; पाहा VIDEO
घडलं असं की, फसवणुक झालेली मुलगी तिच्या वडिलांच्या मोबाईलवरून इंस्टाग्राम वापरात होती. यामुळे मुलीला इंस्टाग्रामवर सोनाली सिंह नावाच्या व्यक्तीकडून फॉलो रिक्वेस्ट आली. त्यानंतर त्यांचं बोलणं माझं. यानंतर पीडितेला इंस्टाग्रामवर ५० हजार फॉलोअर्स वाढवून देतो असं आमिष दाखवून त्या बदल्यात सोनालीने ५५ हजार रुपयांची मागणी केली. नांतर मुलीने पैसे वडिलांच्या अकाऊंटमधून पैसे देखील पाठविले मात्र फॉलवर्स वाढले नाहीत. यांनतर मुलीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले असून तिने पोलिसात तक्रार दाखल केली.
‘हाय झुमका वाली पोरं’ गाण्यावर गौतमीने पुन्हा गाजवलं मार्केट; पाहा VIDEO