
सध्या छत्रपती संभाजी नगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कदायक घटना समोर आली आहे. लिफ्टचा दरवाजा अचानक बंद झाला आणि त्यात १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात खळबळ उडाली आहे. साकीब सिद्दिकी असं मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, साकीबचे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे तो आजी आजोबांकडे होता. यावेळी मुलगा खेळत असताना अचानक लिफ्ट चालू झाली आणि त्या मुलाचा गळा अडकल्यामुळे तो कापला गेला.
कटकट गेट भागातील परिसरात हॉस्पिटल जवळच्या बिल्डिंग मध्ये त्याचे आजी आजोबा राहतात. रविवारी रात्री साकीब तिसऱ्या मजल्यावर खेळत होता. त्यावेळी तो लिफ्टमध्ये गेला आणि लिफ्ट सुरू केली. तेव्हा दरवाजा बंद होताना बाहेर पाहताना त्याचा गळा दरवाजात अडकला, लिफ्टमध्ये गळा अडकल्याची घटना इतकी भयंकर होती की त्यामुळे मोठा आवाज झाला. गळा कापला गेल्याने रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. बिल्डिंग मधील रहिवाशांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी लिफ्ट कडे धाव घेतली. मात्र त्या मुलाला वाचवता आले नाही.
शेतकऱ्यांनो फळबाग लावायचा विचार करताय? तर मग ही बातमी तुमच्यासाठी; सरकार देतंय अनुदानासह मोफत रोपे
या प्रकरणाबद्दल माहिती मिळाल्यानंतर जीन्स सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारी घटनास्थळी पोहोचले. साकीबचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात दाखल केलेला आहे. बिल्डिंग जुनीच असल्याने तिथे लिफ्टला सेन्सर नाहीत. मॅन्युअल दरवाजा असल्यामुळे हे प्रकरण घडले आहे. साकीब लिफ्टच्या बाहेर बघत असताना त्याची मान अडकली आणि हा सर्व प्रकार घडला .
Jayant Patil । ब्रेकिंग! जयंत पाटील यांना पुन्हा ‘ईडी’ची नोटीस