डॉक्टर (Doctor) म्हणजे रुग्णांसाठी देव असतो. मात्र खूपदा अशा काही घटना घडतात की, लोकांचा डॉक्टरवरून विश्वास उडतो. तेलंगणातील ( Telangana) जोगुलंबा गडवाल जिल्ह्यात एका खासगी रुग्णालयात एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी डॉक्टरने बेजबाबदारपणा करत एका लहान मुलाच्या जखमेला टाके घालण्याऐवजी त्याठिकाणी फेविक्विक (Feviquick) लावले. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी डॉक्टरांच्या विरोधात पोलीस तक्रार नोंदवली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस सध्या तपास करत आहेत.
IPL | बहुचर्चित आरसीबी विरुद्धच्या सामन्यातून रोहित शर्माची कल्टी! मुंबई इंडियन्सचे चाहते चिंतेत
कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्यातील लिंगसोगूर याठिकाणी राहणारे वंशकृष्ण कुटुंबासह आपल्या एका नातेवाईकांकडे तेलंगणा मध्ये गेले होते. एका लग्नकार्यासाठी ते याठिकाणी आले होते. दरम्यान त्यावेळी लहान मुलांसोबत खेळत असताना त्यांचा मुलगा प्रविण पडला. यामुळे त्याच्या कपाळाला इजा झाली. प्रविणच्या डाव्या डोळ्याच्या वरील भागात दुखापत झाल्यामुळे रक्तस्राव होत होता.
यामुळे त्याला त्वरित आइजा येथील खासगी रुग्णालयात न्हेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी प्रविणच्या झालेल्या जखमेवर टाके घालण्याऐवजी फेविक्विक लावून उपचार केले. ही गोष्ट प्रविणच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली व त्यानंतर पोलिस स्टेशन मध्ये जाऊन डॉक्टरांविरोधात तक्रार केली.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात घडला धक्कादायक प्रकार; वाचून तुम्हालाही बसेल धक्का…