
A girl is stuck in a borewell : गेल्या दोन दिवसांपासून बोअरवेलमध्ये एक चिमुकली अडकली आहे. ही हृदयाचा ठोका चुकवणारी घटना मध्यप्रदेशातील सिहोर जिल्ह्यात घडली आहे. ही चिमुकली केवळ अडीच वर्षांची आहे. या दुर्घटनेने अवघा मध्यप्रदेश थरारला आहे. तब्बल 300 फूट खोल असलेल्या या बोअरवेलमधून गेल्या 28 तासांपासून त्या चिमुकलीला बाहेर काढण्याची मोहीम चालू आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्या जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सिहोरच्या मुंगावली गावामध्ये काल दुपारी 1.30 च्या दरम्यान ही मुलगी त्या बोरवेलमध्ये पडली होती.
Sonu Sood । ओडिशा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सोनू सूदने पुढे केला मदतीचा हात!
त्या मुलीचं नाव सृष्टी कुशवाह असं आहे. सुरुवातीला ती 29 फूट खाली अडकली होती. पण आता ती जवळजवळ 50 फूट खाली गेली आहे. त्या मुलीला पाईपद्वारे ऑक्सिजन आणि खाण्यापिण्याचे साहित्य देण्यात येत आहे. सृष्टी खूपच खाली गेल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट भारतीय सैन्य (Indian Army) दलालाच इथे बोलावून घेतले आहे. त्याचबरोबर या मुलीला बाहेर काढण्यासाठी काही वाटेल ते करा असा आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
बिबट्या घरात घुसला, शिकारही सापडली नाही मग त्याने पळवली ‘ही’ वस्तू; व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
तब्बल 12 फूट खोदकाम केल्यानंतर पुढे दगडांचा व्यत्यय होता, तो पार करण्यासाठी मशीनचा वापर सुरू झाला होता. परंतु मशीनच्या कंपंनांमुळे सृष्टी आणखी खाली जाईल अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे बोरवेलच्या बाजूलाच समांतर असा 25 फुटांचा खड्डा खोदला आहे. सृष्टीच्या बचावासाठी एनडीआरएफचे (NDRF) जवान तसेच पोलीस अधिकारी अटातटीचे प्रयत्न करत आहेत.
मोठी बातमी! गंगा नदीत 1700 कोटींचा पूल कोसळला अन्… व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का
सृष्टी अंगणात खेळत होती. नंतर ती शेजारच्या शेतात गेली. बोअरवेलच्या शेजारी बाजरीच्या पेंढ्या होत्या. त्या पेंढ्यांवरून घसरत सृष्टी त्या बोअरवेलमध्ये पडली. सृष्टीची आई तिला वाचवण्यासाठी धावली परंतु तोपर्यंत सृष्टी खूप खाली गेली होती. एनडीआरएफ व इतर दलातील कर्मचारी त्या मुलीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत.
कोल्हापूर दंगलीवरून अजित पवार यांचे गंभीर आरोप; म्हणाले, “निवडणुका समोर ठेऊन…”
पथरीली जमीनी के कारण बचाव कार्य में समय लग रहा है। जैसे-जैसे हम ज़मीन खोद रहे हैं बच्ची और नीचे जा रही है। अभी बच्ची 50 फीट से ज्यादा नीचे फंसी है। उसे लगातार ऑक्सीजन दिया जा रहा है। हमारी कोशिश है कि उसे जल्दी निकाल लिया जाए: आशीष तिवारी, कलेक्टर, सीहोर https://t.co/6POLZjltIQ pic.twitter.com/Q2DeYiIxGz
— ANI_HindiNews (@AHindinews) June 7, 2023