
ऊसतोड मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःचे गाव सोडून दुसऱ्याच्या गावात येऊन दिवसरात्र काबाडकष्ट कष्ट करत असतात. पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत ते राबराबराबत असतात. या ऊसतोड मजुरांसोबत दिवसरात्र त्यांचे कुटुंब देखील कष्ट करत असते. ऊसतोड मजुरांची पत्नी त्याचबरोबर त्यांची लहान मूल देखील दिवसभर राबत असतात.
बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार नाही, आमदार रोहित पवार यांनी केला मोठा दावा
दरम्यान, आई-वडिलांसोबत ऊस तोडीसाठी गेलेल्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार कळंबमध्ये घडला आहे.
राज्य सरकारने अवकाळी पावसाबाबत शेतकऱ्यांसाठी घेतला धडाकेबाज निर्णय!
या मुलीसोबत घडलेल्या प्रकारबाबत मुलीने १५ दिवस झाले तरी कोणाला सांगितले नाही. यांनतर तिच्या वडिलांनी तिला विश्वासात घेतले आणि नंतर त्या मुलीने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. यांनतर त्या मुलीने औषध पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न देखील केला. आता या मुलीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वात मोठी बातमी! नरेंद्र मोदी आणि CM योगींना जिवे मारण्याची धमकी
सूत्रांच्या माहितीनुसार, टोळी मुकादमाच्याच मुलाने या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी नराधमाविरोधात गुन्हा दाखल केला असून हे या प्रकरणाचा तपास सांगलीचे पोलीस करत आहेत.