रेल्वे स्टेशन म्हंटल की गर्दीच ठिकाण आलं. आपण आत्तापर्यंत रेल्वे स्टेशनवर चोरी, मारामारी, आत्महत्या केल्याचा प्रयत्न अशा अनेक घटना ऐकल्या आहेत. मात्र सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळी 9 च्या दरम्यान अचानक रेल्वे स्टेशनवरील स्क्रीनवर अश्लील आणि विचित्र काहीतरी सुरू झालं. त्यामुळे तेथील परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
“…त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही”, अजित पवार कडाडले
स्टेशनच्या एका प्लॅटफॉर्मवरील टीव्हीवर अचानक ब्लू फिल्म सुरू झाली. जवळपास 3 मिनिटं ही फिल्म सुरू होती. यामुळे प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. यामधील काही प्रवाशांनी तर त्या ठिकाणचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मार्केटमध्ये आलाय ‘मटका डोसा’, डोसा बनवण्याची पद्धत पाहून लोक म्हणाले…
ही घटना बिहारमधील पटना रेल्वे स्थानकात घडली आहे. त्यामुळे सगळीकडे संताप देखील व्यक्त केला जात आहे. टीव्हीवर अचानक काहीतरी अश्लील प्रकार घडल्याने रेल्वे कर्मचारी घाबरले असून त्या ठिकाणी खळबळ उडाली आहे.
व्हॉट्सअॅपने आणले भन्नाट फीचर! आता फोटोमधून कॉपी करता येणार टेक्स्ट