आजच्या कलियुगात विज्ञान-तंत्रज्ञान ( Science and Technology ) एवढ्या पुढे गेली आहे की कोणतेही समस्या असो त्याच्या पाठपुरावा केला जातो. परंतु तरीदेखील काही लोक हे अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. अशीच एक घटना सांगली ( sangli ) जिल्ह्यामधील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावात घडली आहे. १४ वर्षाचा मुलगा मांत्रिकांच्या मारहाणीत ( Beaten by a wizard ) मोठ्या प्रमाणावर जखमी झाला आणि या मुलाचं निधन झालं आहे.
आर्यन दिपक लांडगे असे या मुलाचे नाव आहे. आर्यन आजारी असल्याने त्याला ताप येत होता. तो लवकर बरा होत नसल्याने त्याला कर्नाटकातील कुडची जवळील शिरगूर या गावातील आप्पासाहेब कांबळे या मंत्रिकाकडे घेऊन जाण्यात आले होते. आर्यनला मांत्रिकाने बाहेरची बाधा झाली आहे असे सांगितले. व त्याच्या शरीरामधील भूत बाहेर निघत नाही असे म्हणत मुलाची भूतबाधा बाहेर काढण्यासाठी मंत्रीकाने मोठ्या प्रमाणात मारहाण केली. आर्यनला इजा झाल्याने मिरज मधील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असतानाच आर्यनचा मृत्यू झाला.
घरातील सोनं मोडून तरुण शेतकऱ्याने कृषी कार्यालयावर उधळले टोपलीभर पैसे; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
शनिवारी आर्यनचा मृत्यू झाल्याने सर्व घटनेचे गांभीर्य घेऊन कवठेमहांकाळ अंनिसच्या काही कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावांतील त्या कुटुंबातील नातेवाईकांची भेट घेऊन त्या मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांत्रिकाच्या या मारहाणीमुळेच आर्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मांत्रिकावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी त्यांच्या गावातील नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे. आर्यनच्या आईला पोलीस ठाण्यामध्ये बोलून या घटनेचे फिर्याद दाखल केली आहे.
Petrol & Disel Fraud | पेट्रोलपंपावर अशी केली जाते फसवणूक ! पैशांसोबत गाडीचे देखील होते मोठे नुकसान