दिवसेंदिवस सोशल मीडियाचा ( Social Media) वापर वाढत आहे. लाईक, कमेंट आणि शेअरची भुरळ लोकांमध्ये आजकाल पहायला मिळते. यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर फोटो, व्हिडीओ पोस्ट करण्याची स्पर्धा युजर्समध्ये वाढली आहे. या स्पर्धेमुळे मानसिक ताण तर येतोच मात्र बऱ्याचदा मोठे नुकसान देखील होते. फोटो काढताना किंवा व्हिडीओ काढताना आजूबाजूला लक्ष न दिल्याने अपघात झाल्याचे व जीवावर बेतल्याचे तुम्ही अनेकदा वाचले असेल.
मोठी बातमी! ‘आई कुठे काय करते’ फेम गौरीचा मोठा अपघात
दरम्यान, सध्या देखील रिल्स काढताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील एक विद्यार्थी रील्स बनवण्यासाठी कॉलेजच्या छतावर चढला आणि पडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भारतीय ध्वजावर शाहीद आफ्रिदीने केली सही; पाहा Video
माहितीनुसार, मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आशुतोष साव असे होते. तो अवघ्या २० वर्षांचा होता. आशुतोष आपल्या मित्रांसोबत कॉलेजच्या छतावर इंस्टाग्राम रील्स बनवण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी चढला होता. यावेळी त्याचा छतावरून खाली पडून मृत्यू झाला आहे.
दोघींच्याही घायाळ अदा मात्र, सबसे कातील कोण गौतमी पाटील की संध्या पाटील? पाहा VIDEO