भारतीय संस्कृतीमध्ये रामनवमीला जास्त महत्त्व दिलं जातं. काल देशभर रामनवमीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिंकामध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळत होता. रामनवमी निमित्तानं विवध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते. अशातच आता वाददेखील निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. आणि या वादातून तरुणांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी घातला तुफान राडा!
सध्या जालना शहरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काल गुरुवारी रामनवमी उत्सवानिमित्त रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकीत एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
‘भोला’ चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला! रामनवमीची सुट्टी असूनही थिएटर्स रिकामेच
घटना घडली अशी की, काल राम नवमीनिमित्त जालन्यामध्ये मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये तरुणांमध्ये नाचण्यावरून वाद झाला आणि एका तरुणाची भोसकून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, २८ वर्षीय विष्णू रामकिसन सुपारकर असं निर्घृण हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कांद्याला अनुदान मिळण्याचा आज शेवटचा दिवस; पाहा काय आहेत कांद्याचे दर?