
पालकांना वाटते आपल्या मुलांनी चांगलं शिकावं चांगल्या पगाराची नोकरी करावी अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. त्यासाठी पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. ते मुलांना वारंवार अभ्यास करण्यास सांगत असतात. मात्र मुलांना पालकांनी अभ्यास करण्यास सांगितल्यावर पालकांचा राग येतो आणि रागामध्ये मूल कोणतंही टोकाचं पाऊल उचलतात. दरम्यान सध्या एक धक्कदायक घटना समोर आली आहे.
आता मला बापासारखी माया कोण देणार? गिरीश बापटांच्या निधनानंतर अभिनेत्री भावुक
वडिलांनी अभ्यास करायला सांगितलं म्हणून ९ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडू मधील पेरियाकुप्पम या ठिकाणाहून ही धक्कदायक घटना समोर आली आहे.
घटना घडली अशी की, मुलगी शेजारच्या घरी खेळत होती यावेळी तिचे वडील आले आणि तिच्याकडे घराची चावी दिली आणि अभ्यास करायला सांगितले. त्यांनतर वडील गाडीत पेट्रोल भरण्यासाठी निघून गेले. मात्र तोपर्यंत या मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.