बीड : अधिकारी व्हायचं स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. यामध्ये ग्रामीण भागातील तरुणाईची संख्या जास्त आहे. नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पार पडली. ( MPSC Exam) यामध्ये एकूण ४ लाख ६७ हजार ८५ उमेदवार सहभागी झाले होते. यामार्फत राज्य शासनाच्या विविध विभागातील एकूण ८ हजार १६९ पदे भरली जाणार आहेत. दरम्यान ही परीक्षा देऊन आलेल्या बीड ( Beed) मधील एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या ( Sucide Case) केली आहे.
अजित पवारांचा संजय राऊतांवर इफेक्ट! म्हणाले, ” मी राष्ट्रवादीत कुठलाच हस्तक्षेप करणार नाही…”
एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने या तरुणाने आत्महत्या केली आहे. अक्षय अप्पा पवार असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अक्षय हा मूळचा माजलगाव तालुक्यातील राजेवाडी गावचा रहिवासी आहे. सध्या तो संभाजीनगर येथे एमपीएससीची तयारी करत होता. ३० एप्रिलला झालेल्या परीक्षेसाठी तो बीडला आला होता. मात्र त्याला पेपर अवघड गेला.
Sharad Pawar । शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर त्यांची बहीण भावुक…
यामुळे तो खूप चिंतेत होता. परीक्षा झाल्यानंतर तो आपल्या मित्राच्या खोलीवर मुक्कामासाठी थांबला. मात्र पेपर अवघड गेल्याच्या तणावाखाली येऊन त्याने गळफास घेतला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अक्षयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घटनेबाबत माहिती मिळताच अक्षयच्या कुटुंबाला धक्का बसला आहे.
Whatsapp New Feature । व्हॉट्सअॅप मध्ये नवीन फिचर आले रे…, जाणून घ्या सविस्तर