अलीकडील काळातील तरुण हे मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर करतात. या मोबाईलच्या वापरामुळे मुलांच्या शरीरावर वाईट परिणाम ( Bad effects on the body ) देखील होतो. सध्या मोबाइलला चे स्फोट होण्याचे प्रमाण देखील खूप वाढले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. मोबाईलचा स्फोट होऊन दहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाईल देताना लक्ष ठेवायला हवे.
रेल्वेच्या भयाण अपघाताचे खरं कारण आलं समोर; वाचून तुमच्या अंगावर येईल काटा
मोबाईलचा स्फोट झाल्याने मुलगा जखमी होऊन डोळ्याला व पायाला दुखापत झाली आहे. हा स्पोट कशामुळे झाला याचे कारण समोर आले नाही. परंतु हा स्फोट झाल्याने पालक चिंतेत आहेत. ही घटना शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे घडली आहे. जखमी झालेल्या तरुण साहिल नाना मस्के याला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोबाईलचा स्फोट होण्याची कारणे
१. मोबाईल चार्जिंगला लावला असता वापरल्याने मोबाईलचा स्फोट होतो
२. मोबाईल हा सूर्यप्रकाशामध्ये ठेवून चार्जिंग केल्यामुळे मोबाईल गरम होऊन देखील स्फोट होऊ शकतो.
३. मोबाईल हा चार्जिंगला असताना कॉल वर बोलताना देखील मोबाईलचा स्फोट होऊ शकतो.
Ambani House Visit | फक्त २ रुपयात अंबानींचे घर पाहण्याची सुवर्णसंधी; कसं ते जाणून घ्या