राज्याच्या काही भागात पाणीटंचाईची (Water shortage) समस्या जाणवू लागली आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट येऊ शकते. अशातच एक धक्कादायक घडली आहे. पाण्यातील विद्युत मोटर पाण्यात ठेवण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना सांगली जिल्ह्यात (Sangli) घडली आहे. अनिकेत अमृत विभुते (वय 24 वर्षे रा. माडगुळे) आणि विलास मारुती गूळदगड (वय 45 वर्षे रा.शेवते) असे मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. (Latest Marathi News)
Maharashtra rain । राज्यात आज पुन्हा मुसळधार पाऊस! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट जारी
ही घटना सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यातील आहे. अनिकेत विभूते यांची माडगुळे या ठिकाणी शेती आहे. त्यांनी आटपाडी तलावातून पाईपलाईन आणली असून तराफ्याद्वारे विद्युतपंप (Electric pump) पाण्यात सोडला आहे. गुरुवारी दुपारी 3.30 च्या दरम्यान आटपाडी तलावातील पाणी पातळी कमी झाल्याने हे दोन शेतकरी पाण्यातील विद्युत मोटर पाण्यात ठेवण्यासाठी गेले होते.
आक्रोश आणि फक्त आक्रोश; इर्शाळवाडी या ठिकाणी भयानक स्थिती
त्यावेळी वायर शॉर्ट होऊन वीजप्रवाह पाण्यात उतरल्याने दोघांचाही विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी वीजप्रवाह बंद करून दोघांना बाहेर काढले. त्यांना दवाखान्यात नेले परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.