
सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे यामध्ये अनेकजण गड किल्ले किंवा इतर पर्यटनस्थळी फिरायला जातात. मात्र पर्यटनस्थळी फिरताना काही धक्कादायक घटनांना आपल्याला सामोरे जावे लागते. सध्या देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सज्जनगडावर जात असताना गाडीचे नियंत्रण सुटल्याने तवेरा ८०० फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर इम्पॅक्ट! शासकीय निवासस्थानावरील अतिखर्चिक पाहुनचाराला लावली कात्री
ही घटना रात्रीच्या वेळेस घडली. नंतर या घटनेबाबत पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी सकाळी शोध सुरु केला. या घटनेमध्ये कारचा चक्काचूर झाला असून कारमधील चालकही मृतावस्थेत सापडला आहे.
महत्वाची बातमी! पुण्यातील ‘हा’ रोड दोन दिवस असणार बंद
सूत्रांच्या माहितीनुसार, अजित शिंगरे असं मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल केला आहे. आता घटनेनं तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ट्रॅफिक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, बंद पडलेल्या ट्रकला दिला धक्का; पाहा Video