
वीज कर्मचाऱ्यांचे काम अतिशय धोकादायक असते. त्यामुळे त्यांना सतत सावध राहून काम करावे लागते. मात्र तरी देखील वीज कर्मचाऱ्यांच्या मृत्यूंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नुकताच बार्शीमधील ( Barshi ) एका वीज कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यु झाला आहे. विस्कळीत झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी हा कर्मचारी डीपीवर चढला होता. यावेळी विजेचा धक्का लागल्याने त्याला जीव गमवावा लागला.
प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी! कल्याणी पाटीलला चितपट करून मिळवली गदा
निलेश रामभाऊ होनराव असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. मालवंडी येथे ही घटना घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अगदी 15 च दिवसांपूर्वी निलेशचा साखरपुडा झाला होता. काही दिवसांनी त्याचे लग्न देखील होणार होते. मात्र विवाह बंधनात अडकण्याअगोरच काळाने घाला घातल्याने त्याच्या कुटूंबियांचा आक्रोश सुरू आहे.
त्याच झालं असं होतं की, विद्युत ( Electricity) पुरवठा व्यवस्थित करण्यासाठी निलेश पाटील म्हात्रे यांच्या शेतात असणाऱ्या विद्युत रोहित्रावर चढला. परंतु, काम सुरू असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाला. यामुळे विजेचा धक्का लागून निलेश जागीच लटकला. या घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
मोठी बातमी! प्रसिद्ध हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांच्यावर पैसा घेऊन हवामान अंदाज सांगण्याचा आरोप