Killing a person with a hammer : प्रेमात लोक कोणत्या थराला जाऊन पोहोचतील याच गणित आता डोक्या बाहेरची केस आहे. क्षणिक मोहापायी लोक एवढ्या खालच्या थराला कसे काय जातात, आजच्या समाजापुढील हा मोठा प्रश्न आहे. अशीच एक प्रेम संबंधातून खून झाल्याची घटना घडली आहे. सुरेशकुमार मांगीलाल कुमावत या व्यक्तीचे महिलेशी प्रेमसंबंध होते. परंतु तिच्या पतीला ही बाब कळल्यामुळे त्याची हातोड्याने हल्ला करत हत्याकांडाची घटना घडली आहे.
हत्या झालेल्या या व्यक्तीचे नाव दिनेश पोसाराम प्रजापती असे आहे. समता नगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. माहितीनुसार, कुमावतचे प्रजापतीच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं म्हणून तिच्या पतीला एवढ्या क्रूरपणे अत्यंत हालहाल करून मारून टाकले. एवढेच नव्हे तर त्याचा मृतदेह पोत्यात भरून आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ठाण्यातील (Thane) जंगलात नेऊन पुरला.
कोल्हापुर प्रकरणावरून शरद पवारांचे सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले…
चौकशीनुसार, कुमावत हा बोरिवली (Borivali) पूर्वभागातील रहिवासी आहे. त्याने प्रजापतीची हत्या केली असल्याचे कबूल केले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी प्रजापतीचा अर्ध कुजलेला मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला आहे. प्रजापती 1 जून पासून बेपत्ता झाला होता. त्यामुळे २ जूनला समता नगर पोलील ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली गेली. नंतर झोन-१२च्या उपायुक्त स्मिता पाटील निरीक्षणात प्रजापतीचा शोध घेतला गेला. सीसीटीव्हीची तपासणी केली तेव्हा, बाईकवरून राजेंद्र नगरमधील एक व्यक्ती चाळीमध्ये गेला. परंतु तो पुन्हा माघारी फिरला नाही. पण दुसरी व्यक्ती चाळीमधून प्रजापतीच्या बाईकसह बाहेर पडली. ती व्यक्ती पोत घेऊन जाताना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
WTC मॅचच्या पहिल्याच दिवशी ‘हे’ बडे प्लेयर भिडले! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल