बॉलिवूडचा लोकप्रिय गायक हनी सिंगची ( Honey Sing) युवकांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. म्युझिक इंडस्ट्रीमधील नावाजलेला गायक म्हणून त्याला ओळखले जाते. हनी सिंगच्या गाण्याचे जगभरात चाहते आहेत. आपल्या कलेच्या जोरावर त्याने आजपर्यंत भरपूर प्रसिद्धी व संपत्ती मिळवली आहे. सध्या तो आपल्या ‘हनी सिंग ३.०’ ( Honey Sing 3.0) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
“…तर मला गुंड होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही”; सलमानचे वक्तव्य चर्चेत
या आनंदात असतानाच हनी सिंग एका अडचणीत सापडला आहे. मुंबईमधील एका व्यक्तीने हनी सिंग विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. विवेक रमण असे या व्यक्तीचे नाव असून त्याने हनी सिंगवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये मारहाण व किडनॅपिंगचा ( Kidnapping) समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार विवेक रमण या व्यक्तीने हनी सिंगच्या एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
राजकारणात लवकरच दोन मोठे भूकंप येणार; प्रकाश आंबेडकर आपल्या मतावर ठाम
मात्र पैशाची देवाणघेवाण करण्यात झालेल्या घोटाळ्यामुळे हा कार्यक्रम करण्यात आला होता. यामुळे नाराज झालेल्या हनी सिंगने आपल्या मित्रांना सोबत घेऊन विवेकला एका हॉटेल मध्ये किडनॅप करून ठेवले. यावेळी विवेकला मारहाण सुद्धा करण्यात आली. असा आरोप विवेक रमण याने केला आहे.
सावधान! तुम्हीही कलिंगडावर मीठ टाकून खाताय का? तर हे एकदा वाचाच