सध्या जळगाव जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) पाचोरा तालुक्यातील (Pachola Taluka) नगरदेवळा या ठिकाणी वडील आणि मुलावर मधमाश्यांची हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भक्त आणि सुरक्षारक्षकांनमध्ये हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या धक्कादायक घटनेमध्ये पित्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला असून मुलाला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
पुण्यातील भाजपच्या बॅनरबाजीवर अजित पवार यांनी व्यक्त केला संताप; म्हणाले…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आबिद सब्दर सैय्यद हा मुलगा आणि त्याचे वडील काही कामासाठी गावाबाहेर गेले होते. यावेळी घरी परतताना अचानक शिंदोळ रस्त्यावर दुचाकीवरून जात असताना झाडावर बसलेल्या मधमाशांनी या दोघांवर हल्ला केला. आणि या हल्ल्यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर मुलावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
“…तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या” सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांवर हल्लाबोल