मुंबईमधून (Mumbai) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दहिसर ते मीरा रोड दरम्यान जयपूर मुंबई पॅसेंजर (Jaipur Mumbai Passenger) एक्स्प्रेसमध्ये अंदाधूंद गोळीबार झाला आहे. पालघर (Palghar) रेल्वे स्थानकाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. आरपीएफच्या (RPF) एका कॉन्स्टेबलने गोळीबार केल्याची माहिती आहे.
Sharad Pawar । … तर राज्यात सत्तांतर होईल; शरद पवारांचं सूचक वक्तव्य
या घटनेची माहिती मिळताच जीआरपी (GRP) आणि आरपीएफ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथामिक माहितीनुसार, जयपूर-मुंबई चालू ट्रेनमध्ये एस्कॉर्ट ड्युटीमध्ये सीटी चेतनने एका वादामुळे एस्कॉर्ट इनचार्ज एएसआय टिका राम यांच्यावर गोळीबार केला. ASI शिवाय ३ नागरीकांचा मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
जीआरपी जवानांनी या कॉन्स्टेबलला ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस रेल्वेतील प्रवाशांचे जबाब नोंदवत आहेत. दरम्यान, हा हा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला? यामागचा हेतू काय? याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे.