
सुट्टीचा दिवस गाठून फिरायला जाणे हा अनेकांचा छंद असतो. सध्या देखील मे महिना म्हणजे सुट्ट्यांचा महिना आहे. बरेच लोक फिरण्यासाठी समुद्र किनारी किंवा स्विमिंग पूलमध्ये जातात. मात्र बऱ्याचदा हे सुट्ट्यांचे (Holiday Plans) प्लॅन्स चांगलेच अंगलट येतात. अशीच एक घटना धक्कादायक घटना श्रीवर्धनच्या दिवेआगर या ठिकाणी घडली आहे.
संजय राऊत काढणार नवीन चित्रपट! नावही केले जाहीर; म्हणाले, “केरला स्टोरी सारखे…”
श्रीवर्धनच्या दिवेआगर येथे आपल्या कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या पाच वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 30 सेकंदात चिमुरड्याला मृत्यूने गाठले आहे. चिमुरड्याचा स्विमिंग पूल मध्ये पडून मृत्यू झाला आहे. हा मुलगा स्विमिंग पूलमध्ये बुडतानाची घटना देखील कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
मजुराच्या खात्यात १७ रुपयांऐवजी आले १०० कोटी, मग झालं असं काही वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
आविष्कार येळवंडे असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. तो पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यातील सावरदारी गावचा आहे. आविष्कार हा आपल्या कुटुंबासह दिवेआगर इथं फिरायला आला होता. यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. त्याच्या जाण्याने कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.