लावणी कलाकार गौतमी पाटील (Gautami Patil) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या गौतमी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. गौतमी पाटील हिच्या बदनामीचे एक धक्कादायक प्रकरण पुण्यामध्ये उघडकीस आले आहे.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरूणी थेट लंडनहून पुण्यात!
पुण्यात शोदरम्यान गौतमी पाटील कपडे बदलत असताना कोणीतरी तिचा व्हिडीओ काढला असून तो व्हायरल केला आहे. गौतमी पाटीलची वाढती लोकप्रियता पाहून तिला बदनाम करण्यासाठी हे घृणास्पद कृत्य करण्यात आलं असल्याचं बोलल जात आहे. आता याबाबत गौतमी पाटीलने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.
कमी मतदानावरुन संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पुणेकर घरी बसतील…”
गौतमी पाटीलचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल होताच समाजातून तीव्र संतापाची प्रतिक्रिया उमटत आहेत. आता याबाबत पोलीस यंत्रणा पुढील तपास करत आहे. दोषी व्यक्तींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सुप्रिया सुळे यांनी केला मोठा दावा; म्हणाल्या, “पुणे मेट्रोच्या कामात तांत्रिक चुका”