श्रीगोंदा : श्रीगोंदा (Shrigonda) शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मांडवगण (Mandavagan) रस्त्यावरील शिक्षक कॉलनी परिसरामध्ये गॅसची टाकी लिकेज होऊन घराला आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. १० ऑक्टोबरच्या रात्री 7:30 ते 8:00 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
Viral Video: अरे हे काय? पाठीवर दप्तर टाकून चक्क कुत्रे पाहतायत स्कूल बसची वाट
या घटनेमध्ये साईनाथ गॅस एजन्सीचे (Sainath Gas Agency) कर्मचारी आणि गॅस टाकी वितरण करणारे पवन मखरे (Pawan Makhare) हे जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ” मखरे हे गॅस लिकेज आहे का नाही पाहण्यासाठी गेले असता तेवढ्यातच गॅसच्या टाकीने पेट घेतला. “
महत्वाची बातमी! तिकीट मशीन बिघडल्यास कंडक्टरच्या पगारातून पैसे होणार कट
घरातील लोक आग लागताच घराबाहेर पळाले पण मखरे यांच्या तोंडाला जखम झाली. नंतर घटनास्थळी श्रीगोंदा नगरपरिषदेची अग्निशमन (fire fighting) यंत्राना पोहचली. या दुर्घटनेने घरातील बरेच सामान जळले आहे. या धक्कादायक घटनेने सभोतालच्या परिसरात खळबळ उडाली आहे.