धक्कादायक! दुर्गा पूजेला बकऱ्याच्या ऐवजी चिमुकल्याचाच गेला बळी, वाचा सविस्तर

Shocking! In Durga Puja, instead of a goat, a small child was sacrificed, read in detail

झारखंड: काल (5ऑक्टोबर) संपूर्ण देशभरात आप-आपल्या रितीरिवाजानुसार दसरा (Dasara) सण उत्साहात पार पडला. परंतु झारखंडमध्ये (Jharkhand) दसऱ्यादिवशी एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. ज्यामुळे या सणाला गालबोट लागले आहे. झारखंड राज्यांमधे सण-उत्सवादरम्यान देवीच्या देवळात बळी देण्याची प्रथा (The practice of sacrifice) आहे. याशिवाय नवस पूर्ण झाल्यानंतरही बळी देण्याची परंपरा आहे. या बळी देण्याचा प्रथेला झारखंडमध्ये खूप मानतात. मात्र ही परंपरा आज एका चिमुकल्याच्या जीवावर बेतली आहे.

Shrigonda: श्रीगोंद्यात पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या, समोर आल धक्कादायक कारण; वाचा सविस्तर

दसऱ्यादिवशी झारखंडमध्ये परंपरेनुसार दुर्गा पूजेदरम्यान (Durga Pooja) बकऱ्याचा बळी दिला जातो. ही तिथली प्रथा आहे. दरम्यान या प्रथेनुसार बकऱ्याचा बळी देत असताना अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. दसऱ्यादिवशी अस घडल की झारखंडमधील लालपूर गावात दुर्गा पूजा सुरु होती. तिथल्या प्रथेनुसार दुर्गा पूजेदरम्यान बकऱ्याचा बळी दिला जात होता. परंतु याचवेळी बळी देण्यासाठी घेतलेले हत्यार तुटले. अन् ते हत्यार तेथे उपस्थित असलेल्या एका तीन वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर पडले.

Eknath Shinde: शिंदेंचे भाषण सुरू असताना निम्म्यापेक्षा जास्त लोक निघून गेले

दरम्यान या घटनेत तो मुलगा गंभीर जखमी झाला. तत्काळ त्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घेतली. पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी सांगितला उद्धव ठाकरेंसोबतचा ‘तो’ किस्सा; म्हणाले, “त्याला हार्ट अटॅक…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *