पुण्यामध्ये गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही. गुन्हेगारीच्या सतत घटना पुण्यामध्ये घडत आहेत. यामध्येच आता पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये (Sassoon Hospital, Pune) दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यावेळी दोन टोळक्यांनी ससून रुग्णालयामध्ये येत एकमेकांवर कोयत्याने हल्ला करुन दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे.
महाराष्ट्रात सत्तांतर करण्यासाठी सुमारे 2 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
या टोळक्याने रुग्णालयामध्ये केलेल्या दहशतीमुळे रुग्णालयातील (A citizen of the hospital) नागरिक घाबरून पळून जाऊ लागले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी आले.
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया!
पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींना अटक केली असून काही आरोपी फरार झाले आहे. या हाणामारीमध्ये जवळपास तीन ते चार जण जखमी झाले. आता यामुळे पुणे सुरक्षीत आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
“अजित पवारांचे पुण्यात येऊन बारा वाजवीन”, नारायण राणेंचा गंभीर इशारा