सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस (Police) आपल्या संरक्षणासाठी दिवसरात्र तैनात असतात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते इतरांचं संरक्षण करत असतात. मात्र सध्या एका टोळक्याने पोलिसांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यामधील वारजे माळवाडी परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Latest Mrathi News)
Rakhi Sawant । राखी सावंतने भर पावसात डोक्यावर फोडली अंडी; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क
9 ते 10 जणांच्या टोळक्याकडून पोलिसांवर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेमध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की, मध्यरात्री गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या अधिकाऱ्यांकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू होतं. यावेळी पोलिसांना रोझरी स्कूलच्या जवळ काही संशयास्पद हालचाली करताना दिसून आले.
शरद पवारांना मोठा धक्का ते अनेक गौप्यस्फोट; वाचा अजित पवार गटाच्या पत्रकार परिषदेतील मुद्द्ये
यावेळी त्या व्यक्तींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस तिकडे जाऊ लागले मात्र त्या व्यक्तींनी लगेच फायरिंग सुरु केली. आणि अंधाराचा फायदा घेत त्या ठिकाणाहून पळ काढला मात्र या टोळक्यातील पाच जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या झटापटीमध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.