पीएमपीएमएल बसमुळे पुणेकरांचा प्रवास खूप सुखकर झाला आहे. यामुळे कमी पैशामध्ये जास्त ठिकाणी प्रवाशांना फिरता येत आहे. मात्र सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात PMPML ची बस चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.
शरद पवार, गुलाबराव पाटील यांचा एकाच रेल्वे डब्यातून प्रवास, चर्चांना उधाण
पुण्यातील (pune) पालखी सोहळ्यामुळे बस लावण्यास जागा नसल्याने पीएमपीएमएल बस पूलगेट आगारात न लावता सारसबाग (Sarasbag) परिसरात लावण्यात आली. यावेळी बसमध्ये चावी असल्याने चोरट्याने बस चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बस चोरी करणाऱ्या चोरट्याने बसमधील पाच हजारांची बॅटरी चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसला चावी होती आणि गर्दीही मोठ्या प्रमाणात होती हिच संधी साधून चोरट्याने बस चोरून नेली. याबाबत पीएमपीच्या स्वारगेट आगारातील अधिकारी सुरेश सोनवणे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हे ही पाहा –