पुणे : पुण्याच्या (Pune) वाघोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघोलीच्या (Wagholi) मोझे कॉलेज रस्ता येथील सोलासीय सोसायटीच्या चेंबर (chamber) मध्ये कर्मचारी काम करत होते. दरम्यान काम करताना चेंबरमध्ये गुदमरून तीन कामगारांचा(workers) मृत्यू झाला आहे.
बापरे! तब्बल ३५० हून अधिक मुलींशी संजय दत्तचे होते शारीरिक संबंध, समोर आले धक्कादायक कारण
दरम्यान पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी दोन मृत (dead) कामगारांना बाहेर काढले असून एकाचा शोध सुरू आहे. यामध्ये नितीन प्रभाकर गोड (वय 45 वर्षे), गणेश भालेराव (वय 28 वर्षे), सतीशकुमार चौधरी (वय 35वर्षे) रा:वाघोली या तिघांचा मृत्यू झाला आहे.
आज वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस, जाणून घेऊया आजच महत्व
घटनास्थळी लोणीकंद पोलिसांचे पथकही दाखल झाले आहे. पुढील तपास सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघांचा काम करत असताना चेंबर मध्येच गुदमरून मृत्यू झाला आहे. दरम्यान फायर ब्रिगेडचे विजय महाजन, अक्षय बागल, मयूर गोसावी ,चेतन समशे, तेजस सागरे, नितीन माने ,संदीप शेळके ,अभिजीत दराडे, विकास पालवे यांच्या टीमने त्यांचा शोध सुरू केला असून दोघांना चेंबर मधून बाहेर काढण्यास आले आहे. तर एकच चा शोध अद्याप सुरूच आहे.