राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe) यांचे ‘शिवपुत्र संभाजी’ नाटक बरेच चर्चेत आहे. ( Shivputra Sambhaji Drama) या महानाट्याचे प्रयोग महाराष्ट्रभर सुरू आहेत. या महानाट्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद देखील मिळत आहे. मात्र पिंपरी- चिंचवड येथे सुरू असलेल्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अमोल कोल्हे यांना एक घाणेरडा अनुभव आला आहे.
Maharashtra Politics | पहाटेचा शपथविधी हा भाजपचा गनिमी कावा होता; भाजपच्या बड्या नेत्याने केला दावा
पिंपरी- चिंचवड येथील पोलिसांकडूनच हे महानाट्य बंद पाडण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या धमकीनंतर अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे. कार्यक्रमाचे फुकट पास दिले नाहीत तर हे नाटक कसं होतं तेच बघतो, अशी धमकी नाटकाच्या आयोजकाला देण्यात आली आहे. याबाबत स्वतः अमोल कोल्हे यांनी नाटक संपल्यावर सगळ्यांसमोर हा प्रकार सांगितला.
Home Loan | ‘या’ बँका देतात स्वस्तात मस्त गृहकर्ज! एकदा माहिती वाचून बघाच
अमोल यांनी हा प्रकार उघड केला असून याची गृहमंत्र्यांनी दखल घेत चौकशी करावी अशी मागणी देखील केली आहे. याबाबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, “यापूर्वी संभाजीनगर, कोल्हापूर, निपाणी या ठिकाणी जेव्हा प्रयोग झाले त्यावेळी पोलिसांनी खूप मोठे सहकार्य केले मात्र पिंपरी चिंचवडमध्ये आज अतिशय खेदजनक अनुभव आला असल्याचं त्यांनी यावेळी म्हंटल आहे.
Uorfi Javed । मोठी बातमी! उर्फीने गरजू लोकांना वाटल्या ५०० च्या नोटा; व्हिडीओ होतोय व्हायरल