अतिक अहमदच्या हत्येबद्दल समोर आली धक्कादायक माहिती!

Shocking information about the murder of Atiq Ahmed!

मागच्या पाच सहा दिवसापूर्वी गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ (Mafia Atiq Ahmed and Ashraf) यांची प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ ही घटना घडली. दोघांवर 10 पेक्षा जास्त गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली होती. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

मोठी बातमी! राहुल गांधी यांनी सोडला सरकारी बंगला

अतिक आणि अशरफ यांची हत्या करणाऱ्या आरोपींनी १३ एप्रिल रोजी रात्री एका हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. त्या हॉटेलमध्ये पोलिसांना आता काही वस्तू सापडल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर हे तिनही आरोपी दोन दिवस अतिक आणि अशरफचा पाठलाग करत होते.

गौतमी पाटीलचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल; लोक म्हणाले ही तर…

दरम्यान, गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ अहमद हे दोघे मागच्या काही दिवसापासून पोलिसांच्या ताब्यात होते. त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी त्यांना आणण्यात आलं होतं. यावेळी काही पत्रकार अतिकशी बोलत होते. पोलीस बंदोबस्त देखील कडक होता. मात्र त्याचवेळी मारेकऱ्यांनी पोलिसांच्या घेऱ्यात घुसून गोळीबार केला आणि माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मुलींना लवकर मासिक पाळी का येते? नेमक काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *