
मागच्या काही दिवसापूर्वी अतिक अहमद आणि त्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यांनतर अतिक अहमदची पत्नी चांगलीच चर्चेत आली. तिच्यावर अनेक गंभीर आरोप देखील करण्यात आले. याबाबत आता सध्या एक महत्वाची बातमी समोर आली आहे. (Atiq Ahmed and his brother were shot dead)
माफिया अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन हिला देखील माफिया घोषित करण्यात आले आहे. प्रयागराज पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये शाइस्ता परवीन (घोषित माफिया) च्या नावापुढे गुन्हेगार लिहिले गेले आहे. प्रयागराजमधील धुमनगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेश कुमार मौर्य यांनी २ मे रोजी त्यांच्याच पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला.
Cricket । क्रिकेट विश्वातून समोर आली सर्वात मोठी बातमी!
अतिक अहमद याच्यासोबत तिचे लग्न झाल्यापासून ती अतिकला प्रत्येक गुन्हा करण्यामध्ये साथ देत असल्याचे बोलले जात आहे. उमेश पाल खून प्रकरणाच्या वेळी अतिक अहमद अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात बंद होता. त्यावेळी शाइस्ता परवीन बाहेर होती. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी यूपी पोलीस शाइस्ताचा शोध घेत आहेत.
Sharad Pawar | ठाकरे गटाकडून शरद पवारांवर गंभीर आरोप! अजित पवारांना सुद्धा फटकारले