
Sana Khan Murder । नागपूर : भाजप अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी सना खान (Sana Khan) यांची 2 ऑगस्ट रोजी हत्या केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून अमित शाहुला (Amit Shahu) नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने सना खान यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. परंतु अजूनही त्यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला नाही. या प्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे. (Sana Khan murder case)
Crime News । धक्कादायक! सासऱ्याने केले जावयाचे अपहरण, कारण जाणून तुम्हीही व्हाल चकित
पोलिसांना सना खान यांच्या मृतदेहाचा शोध घेत असताना हिरेन नदीच्या काठावर असणाऱ्या एका विहिरीत महिलेचा मृतदेह सापडला होता. त्या मृतदेहाचे कपडे आणि सना खान यांनी शेवटच्या दिवशी घातलेले कपडे जवळपास सारखेच होते. त्यामुळे पोलिसांना हा मृतदेह सना खान यांचा असल्याचा संशय आला होता. परंतु, सना यांच्या कुटुंबाने तो मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.
त्यामुळे पोलिसांनी डीएनए चाचणी (Sana Khan DNA) करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सना खान यांची आई मेहरुनिसा यांच्या रक्ताचे नमुने घेतले होते. डीएनए चाचणीच्या अहवालानुसार तो मृतदेह सना खान यांचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अजूनही सना खान यांचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह सापडणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात देखील आले आहे.
दरम्यान, अमित साहूने पत्नी सना खान यांची हत्या पैशांच्या व्यवहारातून केली असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. त्याने पत्नीकडून 50 लाख रुपये पार्टनरशिपसाठी घेतले होते. सना खान यांनी हे पैसे परत मागताच त्यांच्यात टोकाचा वाद झाला होता. अमितने रागाच्या भरात लोखंडी रॉड सना खान यांच्या डोक्यात घातला आणि मृतदेह नदीमध्ये फेकून दिला.
Congress । काँग्रेसला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने केला शिंदे गटामध्ये प्रवेश