Ahmednagar Crime । अहमदनगर : अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये दरोडा (Robbery) पडला होता. या प्रकरणात एका बंगल्यात दरोडेखोरांनी पतीची हत्या करून सात लाखांचा ऐवज पळवला होता. आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. (Crime News)
Rohit Pawar । मोठी बातमी! रोहित पवारांचा अजित पवार गटावर गंभीर आरोप; म्हणाले, “सही करा नाहीतर…”
मिळालेल्या माहितीनुसार, एकलहरे गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या बंगल्यात बुधवारी दरोडा पडल्याची माहिती पोलिसांना मृताच्या पत्नीने (Crime) दिली होती. पती नईम रशीद पठाण (40) यांचा गळा आवळून खून केल्याचा दावा पत्नी बुशराने केला. तसेच दरोडेखोरांनी आपल्यावरही हल्ला करत घरातून रोख सात लाख रुपये आणि सोन्याचे दागिने पळवून नेले होते, अशी पोलिसांना माहिती दिली होती.
परंतु नईम पठाण याला पत्नीने संपवल्याची माहिती समोर आली असून पतीची हत्या करून बुशराने दरोड्याचा बनाव केला. बुशराने पाटील झोपेच्या गोळ्या चारून त्याचा साडीने गळा आवळला आहे, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बुशरासह आणखी दोन संशयितांना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.