मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मागच्या काही दिवसापूर्वी शिवाजी पार्क या ठिकाणी मारहाण झाली होती. तीन ते चार जणांनी देशपांडे यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
शिंदे गटातील महिलांकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…
संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये कोणत्याही वरीष्ठ राजकीय नेत्याचा समावेश नसल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अटकेतील चौघांपैकी अशोक खरात मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. यासंबंधित एका वृत्तवाहिनेने वृत्त दिले आहे.
कापसाला भाव नसल्यानें शेतकरी संतप्त; कापसात गाडून घेत केलं अनोखे आंदोलन
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे व खा. संजय राऊत ( Sanjay Raut) यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली होती.
मोठी बातमी! माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक