
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ( Amruta Fadanvis) यांना ब्लॅकमेल केले जात असल्याची चर्चा राज्यभर होत आहे. या प्रकरणी आता सट्टेबाज अनिल जयसिंघानी ( Anil Jaysinghani) व त्यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानी यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीने पोलीसांना देखील धक्का बसला आहे.
मुकेश अंबानींची मार्केट मध्ये नव्या प्रोडक्टसह उडी; साबण व इतर सेगमेंट मध्ये ठेवणार पाय!
अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यापूर्वी अनिल व त्यांची मुलगी अनिक्षा व्यवस्थित चर्चा करायचे. अमृता फडणवीस यांना कशापद्धतीने ब्लॅकमेल करायचे? त्यांना कशाप्रकारचे मेसेज पाठवायचे? त्यात कसं आणि काय लिहायचं? तसेच हे मेसेज कोणत्या नंबरवरून पाठवायचे? मेसेज पाठवल्यानंतर सुद्धा काय करायचं ? असे प्लॅनिंग हे दोघे बाप-लेक करायचे.
गूगलवर ‘हे’ नंबर्स कधीच करू नका सर्च, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
ही प्लॅनिंग व्यवस्थित झाल्यानंतरच अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केलं जायचं. पोलिसांनी अनिल व अनिक्षा यांची कसून चौकशी केल्यानंतर त्या दोघांनी ही कबुली दिली आहे. अमृता फडणवीस यांना फसवण्याच्या उद्देशानेच ब्लॅकमेल केले असल्याचे चौकशीमधून स्पष्ट होत आहे.
रामदेव बाबा 100 तरुण तरुणींना देणार सन्यास; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
या प्रकरणी अमृता फडणवीस यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर अनिक्षाला अटक करण्यात आली व त्यानंतर तिच्या वडिलांना देखील अटक करण्यात आली. मात्र आपल्या वडिलांवरील केस मागे घेण्यासाठी अनिक्षाने अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच देण्याची ऑफर सुद्धा दिली होती. मात्र अमृता फडणवीस यांनी यासाठी नकार दिला.
कांदा पिकाला पाणी देत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला!