Pune Crime News । पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणात धक्कादायक माहिती; मिस्ट्री गर्ल आली समोर

Pune Crime News

Pune Crime News । पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे (Crime in Pune) प्रमाण खूप वाढले आहे. विशेष म्हणजे पुण्यात कायदे कठोर केले आहेत, तरीही सतत गुन्हे घडत आहेत. गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहता पुण्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही असे बोलले जात आहे. अशातच आता पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्स (Pune International Drugs) प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे.

Maratha reservation । सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणावर न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

मुख्य आरोपी संदिप धुनिया (Sandeep Dhunia) याच्या प्रेयसीसह आणखी एक तरुणी या रॅकेटमध्ये सहभागी आहे, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सोनम पंडितला अटक केली आहे. पोलिसांनी सोनमची कसून चौकशी केली असता पोलिसांना तिने आपण या प्रकरणात सहभागी असल्याची माहिती दिली. सोनम आणि तिची मैत्रीण पैसे हवालामार्फत पाठवतात, असा संशय आहे.

Emraan Hashmi । इमरान हाश्मीने केला सर्वात धक्कादायक खुलासा

पोलिसांनी साडेतीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे १८०० किलो एमडी जप्त केले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ११ आरोपींना अटक केली असून यामागचा मुख्य आरोपी आणि मास्टरमाईंड संदीप धुनियाला पकडण्यात अजूनही पोलिसांना यश आले नाही. पोलिस संदीप धुनिया नेपाळमधील काठमांडूमार्गे कुवेतमध्ये पसार झाल्याचा अंदाज वर्तवत आहे.

Anant Radhika । कुणी महागडी पर्स तर कुणी लक्झरी स्पोर्ट्स कार… अनंत-राधिकाला बॉलिवूड कलाकारांनी आहेरात दिल्या या महागड्या भेटवस्तू

Spread the love