दिल्ली (Delhi) येथे लिव्ह इन रिलेशनशीप राहत असणाऱ्या श्रद्धा या तरुणीच्या हत्येने देशात सध्या गोंधळ सुरू आहे. ( Delhi crime) श्रद्धा सोबत राहणाऱ्या आफताब या तरूणानेच तिची हत्या केल्याने वेगवेगळ्या स्तरांतून लिव्ह इन रिलेशनशिप ( Live in relationship) वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आफताबने श्रद्धाची फक्त हत्याच केली नाही तर हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून जंगलात फेकले आहेत. आता या हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत.
म्हशींची दूध क्षमता वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन दिल्याने दुग्ध उत्पादकांना अटक
माहितीनुसार, आफताबच्या २५ गर्लफ्रेंड्स असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आफताबची या मुलींशी ओळख ‘बंबल डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून झाल्याची माहिती समोर आली आहे.
महाविद्यालयाच्या परिसरात मुलींची तुफान हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, या हत्याकांडासंदर्भात पोलिसांकडून एक नवीन माहिती समोर येत आहे. श्रद्धाची हत्या झाली तेव्हा ती गरोदर असावी, असा संशय पोलिसांना आहे. नुकताच श्रध्दाच्या माकडहाडाचा एक तुकडा पोलिसांना सापडला आहे. यावरून श्रद्धा गरोदर होती की नाही हे शोधणे खरंतर कठीण आहे. पोलिसांना तपासात नवनवीन धागे दोरे सापडत आहेत. यातून या हत्याकांडा संदर्भात आणखी नवीन गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.