बारामती: सध्या बारामतीमधून (Baramati) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती येथे भिगवण (Bhigwan) रस्त्यावर एका पत्रकारावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबार झालेल्या पत्रकाराचे नाव आकाश जाधव असे आहे. या घटनेने आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय! महावितरणाला दिले शेतकऱ्यांची वीज न कापण्याचे आदेश
पत्रकार (journalist) या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत. त्यांच्या मणक्याला गोळी लागली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे.
हल्ला झालेले पत्रकार एका स्थानिक वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. बारामती येथील भिगवण रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. आता या घटनेबाबत पोलीस यंत्रणा तपास करत आहेत. नेमका हल्ला का करण्यात आला यामागील कारण स्पष्ट झालेले नाही.
अरे बापरे! मांजराने धु..धू..धुतलं कुत्र्याला; पाहा व्हायरल VIDEO