
मुंबई : शिक्रापूर (shikrapur) पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादयक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. भाजपा नेत्याच्या शेती आणि फार्महाऊसवर (farmhouse) कामाला असणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीसोबत (girl) तिच्याच नात्यातील तरुणाने तिला जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार (raip) केला आहे. विशाल गायकवाड (vishal gaykwad)असे या आरोपीचं नाव आहे. शिक्रापूर पोलिसांनी या नराधम आरोपीस अटक केली आहे. दरम्यान, पीडितेला न्याय मिळवून देत असताना दबाव येणार असल्याचा गंभीर आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केला आहे.
भाजपा नेत्याच्या शेती आणि फार्महाऊसवर विशाल गायकवाड आणि पीडित मुलगी यांचे आई-वडील कामासाठी राहत आहेत. पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान नातेवाईक असलेल्या नराधमाने या फार्म हाऊसच्या मागच्या मजूर खोल्यांच्या मागे या अल्पवयीन मुलीला नेले. तेथे गेल्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. याता याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे.
ड्रॅगन फ्रुट,किवीसारख्या विदेशी फळांची करा लागवड, ‘या’ योजनेअंतर्गत मिळेल अनुदान
….नायतर आम्ही रस्त्यावर उतरू
या प्रकरणाबाबत तृप्ती देसाई यांनी एक मह्त्वपूर्ण माहिती आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या की, हा फार्महाऊस भाजपाच्या नेत्याचा असल्यामुळे या फार्म हाऊसची आणि या नेत्याची चर्चा कुठे होऊ नये, यासाठी दबाव आणला जाऊ शकतो, अशी स्थानिकांनी शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान तृप्ती देसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या बारा वर्षीय मुलीला न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवले जावे अशी मागणी केली आहे. तसेच संबंधित भाजपा नेत्याचा घटनेशी संबंध नसला तरी फार्म हाऊस त्यांच्या मालकीचे आहे. म्हणून हे प्रकरण जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा देखील तृप्ती देसाई यांनी दिला आहे.
Bjp: दिंडोशीमध्ये गणेश विसर्जनाच्यावेळी भाजपच्या दोन गटांमध्ये झाला तुफान राढा